डिंक तस्करांचा सिनेस्टाईल पाठलाग ; मुद्देमालासह दोघे वनविभागाच्या ताब्यात!

सुभाष धाडे: दि 27जाने रात्री नऊ च्या सुमारास मालवाहतूक गाडीतून डिंक तस्करी होत असल्याचे मिळालेल्या गुप्त बातमीवरून वडोदा वनक्षेत्रातील पथकाने कार्य तत्परता दाखवत वनविभागाच्या वाहनाला हुलकावणी देण्याऱ्या तस्करांच्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून शितफीने पकडले. ही घटना दि 26 जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास कुऱ्हा काकोडा परिसरात घडली.
वन सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलई व धावडा या वृक्षांचा सुमारे साडे चार क्विंटल डिंक, चारचाकी वाहन क्र एम एच 04 बी के 8684 वनविभागाने ताब्यात घेत दोन आरोपी सोनू वाघ व मनोज पाटील रा. लोहारखेडे यांच्यावर वनविभागाच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तसेच इतर आरोपीचा शोध सुरु असल्याचे समजते.
परिसरात डिंक तस्करी होत असल्याची वार्ता कळताच उपवनसंरक्षक राम धोत्रे व साहायक उपवनसंरक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा वनक्षेत्रपाल परिमल साळूंखे यांनी वनपाल वंदना कोळी, वनरक्षक स्वप्नील गोसावी,ए एस मोरे, सुधाकर कोळी, वनमजूर योगेश बोरसे आदीचे पथकाने सापळा लावला. दरम्यान वनविभागाच्या वाहनाला हु लकावणी देत तस्करांचे वाहन बेकदारपणे चालवून पळून जात असतांना सिनेस्टाईल पाठलाग करीत मोठ्या शिताफीने तस्करांना ताब्यात घेण्यात यश आले.





