दिव्यांग बांधवांसाठी अमळनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी नुकतेच उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम सखाराम कोळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करून लोकशाही पद्धतीने निदर्शनं करीत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. यामध्ये माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बी.एस. पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. अशोक पवार, शहराध्यक्ष प्रशांत निकम, तालुकाध्यक्ष डी.एम. पाटील, आणि उपाध्यक्ष वासुदेव पाटील (मामा) यांचा समावेश होता . तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराणा प्रताप चौक, विश्रामगृहाजवळ या ठिकाणाहून सर्व दिव्यांग बांधवांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन एकत्रपणे निषेध नोंदवला. दिव्यांग बांधवांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार आहे.