Crime

डॉक्टरला घातला मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखलच्या नावाने ३१ लाखांचा गंडा

अज्ञात चोरट्यांविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा

जळगाव I प्रतिनिधी जळगावमधील एका डॉक्टरला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचा धाक दाखवत तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ इतक्या रकमेचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधिका नावाच्या महिलेने आणि राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी या दोन व्यक्तींनी संपर्क जळगाव शहरातील ५८ वर्षीय डॉक्टर यांना ३१ डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ या कालावधीत संपर्क करून . त्यांनी डॉक्टरांना त्यांनी एका मोबाईल क्रमांकावरून महिलेला अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप केला . तसेच याप्रकरणात बांद्रा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची बतावणी केली. व्हाट्सपच्या माध्यमातून या गुन्हयाची नोटीस पाठवून
मोबाईल क्रमांकाचा मनी लॉन्ड्रिंग व्यवहारात वापर झाल्याचे डॉक्टरला सांगण्यात आले. या गुन्ह्यात नरेश गोयल याला अटक झाली असून डॉक्टरांनाही अटक होऊ शकते, असे सांगून तिघांनी डॉक्टरांकडून वेळोवेळी ३१ लाख ५६ हजार ६४ रूपे इतकी मोठी रक्कम इतर खात्यांमध्ये हस्तांतरीत करून घेतली.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीवरून राधिका, राजेश प्रधान, आणि मुकेश बॅनर्जी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button