डोलारखेड्यात शौर्य दिन उत्साहात साजरा

डोलारखेड्यात शौर्य दिन उत्साहात साजरा
मुक्ताईनगर 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमसैकांकडून विविध उपक्रम राबवून शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अन्यायाविरोधात प्राणपणाने लढणाऱ्या शूरवीरांना विनम्र अभिवादन करीत मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथे भीमसैनिकांकडून विजयाची गाथा सांगणारा शौर्यादिन उत्साहात साजरा करण्यात आला.
मुक्ताईनगर येथील विकी जगन सुरवाडे या तरुणाने शौर्याचे प्रतीक विजय स्तंभ सप्रेम भेट देऊन समाज जागृतीचे कार्य केले.
प्रसंगी गावातून वाजत्री सहित भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान विजय स्तंभाची पुष्पहारांनी सजावट करून सामूहिक मानवंदना देण्यात आली.बाहेर गावावरून अनेक प्रतिष्ठीत लोक प्रसंगी हजर होते.संदिप इंगळे सुकळी, अनिल वाघ नांदवेल, अशोक निकम स,र सुनिल खराटे चारठाणा, अमोल बोदडे नाडगाव बोदवड, छबिलदास इगळे उचंदा, पालवे साहेब पुणे चाकण शरद तायडे वरणगाव, राहुल इंगळे निमखेडी बु, नितीन पाटील, पुंडलिक कोळी सुकळी तसेच गावातील शिवाजी वानखेडे, सिध्दार्थ थाटे, बाळु इंगळे, शत्रुघ्न वानखेडे,संजय इंगळे,महेंद्र इंगळे गणपत इंगळे, दुर्योधन सुरवाडे, भरत वानखेडे सुरेश ईंगळे अंकुश सुरवाडे व सर्व महिला भगिनी उपस्थित होते.






