Social

धुळ्याच्या पोलीस मुख्यालयातील रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची सेवा सुरू

धुळे प्रतिनिधी I –  पोलिस मुख्यालयातील पोलिस रुग्णालय काही वर्षापासून मोडकळीस आले होते . पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात हे रुग्णालय सेवेत रुजू होते . पुन्हा एकदा आता रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे जेणेकरून पोलिस कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे यासाठीडॉ रवी वानखेडकर, पोलिस रुग्णालयातील डॉ शिवचंद्र सांगळे , पोलिस अंमलदार राजे पटेल यांनी . पुढाकार घेतला आहे.

या तज्ञ डॉक्टरांचा समावेश

पोलीस रुग्णालयातडॉ रवी वानखेडकर (सर्जन), डॉ प्रशांत पाटील ( फिजिशियन), डॉ पीयूष वसईकर (ऑर्थो), डॉ मीना वानखेडकर ( गायनॅक).रेडियोलॉजिस्ट डॉ आशिष अग्रवाल यांनी विमला डायग्नोस्टिक मधे २०% सवलत आणि पॅथॉलॉजिस्ट डॉ प्रदीप सोनवणे यांनी ४०% सवलत दिली आहे.

त्याच प्रमाणे पोलिस रुग्णालयाने रेफर केल्यास खालील डॉक्टरांनी पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियाना मोफत तपासणी करण्यात येणार आहे.

डॉ महेश अहिरराव ( चाइल्ड), डॉ भूषण चौधरी ( स्किन ), डॉ जगदीश गिंडोडिया ( सायकोलॉजिस्ट), डॉ प्रफुल भालडे ( ऑफथल), डॉ हेमंत मोर ( का ना घ), डॉ मनीष जखाते ( चेस्ट ).

या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची सेवा सुरू झाल्यानंतर नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.
जे पोलिस ड्रायव्हर हे वर्षानुवर्षे आपले डोळे तपासणी न करता कार्यरत असतात आणि त्यामुळे अपघात घडू शकता त  हे होऊ नये यासाठी त्यांच्या डोळ्याची काळजी घेण्याकरिता धुळे जिल्हा शल्यचिकित्सक दत्ता देगावकर,  यांची टीम डॉ प्रकाश कोळी ,डॉ एस इ शिंपी, डॉ गुणवंत बिर्हाडे, डॉ राजेंद्र रॉय हे सर्व कार्यरत झाले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button