इन्शुरन्स क्लेमसाठी केली हेराफेरी, फिर्यादीलाच खावी लागली जेलची वारी
महा पोलीस न्यूज | ८ एप्रिल २०२४ | एखादा गुन्हा दाखल झाल्यास आरोपी दुसराच निघतो. रावेर येथे फिर्यादीच चोर निघाल्याची घटना समोर आली आहे. इन्शुरन्स क्लेमची रक्कम उकळण्यासाठी फिर्यादीनेच चोरीचा डाव रचल्याचे निष्पन्न झाले असून तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रावेर पोलीस स्टेशन येथे दि.३ एप्रिल रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून लबाडीच्या ईराद्याने चोरी केल्याबाबत फिर्यादी निरज सुनील पाटील वय-२४ रा.निंबोल ता.रावेर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार चोरट्यांनी निरज पाटील यांच्या मालकीच्या नांदुरखेडा शिवारातील श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीमध्ये प्रवेश करुन ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच गावातील लक्ष्मीबाई विश्वनाथ पाटील माध्यमीक विद्यालयाचे मागील बाजुला असलेले कॅमेऱ्यांची तोडफोड करुन नुकसान केले होते.
पोलिसांनी अज्ञात आरोपींचा सीसीटिव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रीक विश्लेषणच्या सहाय्याने शोध घेतला असता गुन्ह्यात संशयीत क्रमांक निरज सुनिल पाटील, वय २४ वर्षे, रा.निंबोल ता.रावेर, उमेश शांताराम सुतार, वय २४ वर्षे, रा.डॉ.बाबासाहेब आंडेकर चौक, कौशल जितेंद्र जंजाळकर, वय १९ वर्षे, रा.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेर यांना ताब्यात घेवून रावेर पोलीस स्टेशन येथे आणले. सर्व संशयीत आरोपींना विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली.
गुन्ह्यात फिर्यादी नीरज पाटील याने श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीचा विमा काढलेला होता, त्याचा खोटा लाभ घेण्यासाठी त्यांनी फौजदारी कट करून श्रीकृष्ण केला वेफर्स फॅक्टरीमधील मजुरांच्या मदतीने रात्री चोरी केली म्हणून फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्ह्यात भादंवि कलम ४५७, १२० (ब),३८१, २०३ असे कलम वाढ करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, पोलीस अंमलदार सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, राहुल परदेशी, अमोल जाधव, विकार शेख, सुकेश तडवी, समाधान ठाकूर यांच्या पथकाने केली आहे.