Social

वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वांची जबाबदारी : डॉ.महेश्वर रेड्डी

महा पोलीस न्यूज | १७ फेब्रुवारी २०२४ | देशभरात दरवर्षी लाखो नागरिकांचा अपघाती मृत्यू होतो. अनेक अपघात केवळ वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होत असतात. वाहतूक नियम हे आपल्या जिवाच्या रक्षणासाठी असून त्याचे पालन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आमच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी ऊन, पाऊस, थंडीत आपल्या रक्षणार्थ कर्तव्य बजावत असतात मात्र काही लोक त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात कमी करणे सहज शक्य होईल, असे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

जळगांव जिल्ह्यात महिनाभर राबविण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चा समारोप व बक्षिस वितरण समारंभ दि.१६ रोजी पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी होते. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव. उपविभागीय अधिकारी संदिप गावित, पोलीस उपअधीक्षक प्रमोद पवार, शहर वाहतुक शाखेचे सपोनि देविदास इंगोले, सपोनि इफ्तेखार सय्यद, सपोनि गणेश बुवा, पोउपनि शामद तडवी, पोउपनि अभिमन्यु इंगळे व शहर वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार यांचे उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांचे शालेय विद्यार्थी, शिक्षकवृंद, ASP, NCC, विद्यार्थी व शिक्षक, ऑटो युनियनचे पदाधिकारी, ट्रॅव्हल्स व ट्रान्सपोर्टचे पदाधिकारी, विविध दैनिकाचे व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे पत्रकार उपस्थित होते.

जिल्ह्यात दि.१५ जानेवारी ते १४ फेब्रवारी २०२४ पावेतो या कालावधीमध्ये केंद्र सरकारचे आदेशान्वये रस्ता सुरक्षा माह साजरा करण्यात आला. दरम्यान शहर वाहतूक शाखा, जळगाव व उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये जळगाव जिल्हयातील व जळगाव शहरातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रभात रॅली, पथनाट्य, हेल्मेट सक्तीने घालावे आशा प्रकारे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

महिन्यात दुचाकीच्या फॅन्सी नंबर प्लेटवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. त्यामध्ये दादा, मामा, काका अशा लिहिलेल्या नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकली शहर वाहतुक शाखा येथे आणुन आर. टी. ओ. च्या नियमाप्रमाणे त्यावर नंतर नवीन प्लेट लाऊन दंडीत करून सोडण्यात आले. जनजागृती करीत असताना जनतेला शहर वाहतुक शाखा येथील आमच्या अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांना रस्ता सुरक्षा माहच्या अनुशंगाने वाहन चालकाला आपले कोणीतरी घरी वाट पाहत आहे त्यामुळे आपण वाहन सुरक्षित चालवावे याबाबत आवाहन करण्यात आले होते.

वाहतुक नियंत्रण शाखेची व पोलीस स्टेशनची कार्यप्रणाली ही कायद्यासोबत प्रबोधनात्मक असते, त्यामुळे वाहतुकीचा संबंध हा चालक, विद्यार्थी, पादचारी यांचा समन्वय साधुन वर्षाच्या सुरुवातीला संपूर्ण देशभर सुरक्षा माहाची आयोजन करण्यात आले होते. तसेच (INDIAN ROAD CONGRESS) चे पालन करण्यात आले. INDIAN ROAD CONGRESS यांचे नियमांचे संपूर्ण देश पालन करीत असतो. तसेच ज्ञान जागृती व्हावी म्हणुन रोड सेफ्टी पेट्रोलचे विद्यार्थी (RSP) सुध्दा चौका-चौकात ऊभे करून स्वतः वाहतुकीच्या नियमांचे घडे देऊन जनतेला मार्गदर्शन केले आहे. रस्ता सुरक्षा माहच्या निमित्ताने जनतेला प्रबोधनासोबत कायदेशीर कारवाईचे सुध्दा मार्गदर्शन केले आहे.

आज रस्ता सुरक्षा माहचा समारोप झाला असला तरीही पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यापुढे देखील राबवला जाणार आहे. शहर वाहतूक शाखेतर्फे सुरू असलेल्या कारवाया यापुढे देखील सुरूच राहणार असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button