महाराष्ट्रातील लाडक्या युवती लढणार फुटबॉलचे महायुद्ध
संजीवनी दिना निमित्त राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा
जळगाव ;-श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे आज ८ डिसेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील १६ वर्षाच्या आतील लाडक्या युवती फुटबॉल च्या स्पर्धेसाठी महायुद्ध लढणार असून यातून महाराष्ट्राचा लाडकी युवती जिल्हा घोषित होणार आहे. यासाठी राज्यातील २४ जिल्ह्यातील ४८० युवती, १४ महिला पंच, ३ महिला निवड समिती सदस्य, ३ महिला फिजिओ व आयोजन समितीतील ११ महिला सदस्य यात सहभागी होत आहे.
*उद्घाटन*
खासदार स्मिता वाघ, अनुभूती स्कूल च्या संचालिका निशा जैन, यांच्या शुभ हस्ते होत आहे.
सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या स्पर्धा सुरू राहणार आहे.
रविवारचे सामने
१)नागपूर विरुद्ध यवतमाळ
२)सोलापूर विरुद्ध बीड
३)रत्नागिरी विरुद्ध जळगाव
४)अमरावती विरुद्ध मुंबई
५) बुलठाना विरुद्ध अहमदनगर
६)सांगली विरुद्ध लातूर
७)वर्धा विरुद्ध नंदुरबार
८) धुळे विरुद्ध औरंगाबाद