Sport
राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सिद्धी ठाकरे ची महाराष्ट्र राज्य संघात निवड
जळगाव :- वेस्ट बंगाल येथे सब ज्युनिअर मुलींचे फुटबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य चा संघ निवडण्यात आला होता त्यात जळगाव जिल्ह्यातील एकमेव खेळाडू सिद्धी ठाकरे हिची निवड झाली होती.
जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, प्रो.डॉ.अनिता कोल्हे प्रशिक्षक अब्दुल मोहसीन, छाया बोरसे, हीमाली बोरेले, रोहिणी सोनवणे यांच्या नेतृत्वात तिने हे यश संपादन केले.
जळगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धेची निवड चाचणी दरम्या तिचे जळगावात आगमन आले असता जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे तिचा सचिव फारूक शेख व कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांनी फुटबॉल देऊन गौरव केला या वेळी खेळाडू, प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.