बनावट नोटीसा पाठवून खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी ; महिलेला २५ लाखात गंडविले

जळगाव प्रतिनिधी :-शहरातील एका महिलेची मुंबईच्या सायबर पोलीस स्टेशन मधील पोलीस असल्याची खोटी बतावणी करून आणि इंटरपोल सीबीआय व सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस देऊन 25 लाखात फसवणूक केल्याप्रकरणी जळगावच्या सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळगाव शहरात राहणाऱ्या एका महिलेला व्हाट्सअप वरून कॉल करून व्हिडिओ व नॉर्मल कॉल करीत मेसेज करून बनावट सीबीआय, इंटरपोल ची रेड नोटीस, सुप्रीम कोर्टाची नोटीस पाठवून महिलेला अटक करण्याची भीती दाखवून तिला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच यातून बाहेर पडायचे असल्यास इन्स्पेक्शन फी म्हणून 25 लाख बँक खात्यात टाकण्याचे संशयित आरोपी प्रविणकुमार, के.सी. सुब्रमन्यम, प्रदिप सांवत, आणि संदिप राव यांनी सांगितल्यावरून महिलेने एका बँकेत पैसे जमा केले.
मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसात धाव घेत प्रविणकुमार, के सी सुब्रमन्यम, प्रदिप सांवत्, आणि संदिप राव असे नाव सांगणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश गोराडे हे करीत आहे.