
सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशनतर्फे पोलीस प्रशासनाचे अभिनंदन
जळगाव प्रतिनिधी I नुकतेच महाराष्ट्राचा हिंदू बांधवांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सव तसेच मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण जशने ईद – ए – मिलाद उन नबी हे दोन्ही धर्मियांचे दोन्ही सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेश विसर्जन मिरवणूक व जुलुसे ईद – ए – मिलाद उन नबी ( मिरवणूक ) या दोन्ही मिरवणूक अत्यन्त उत्साहात व मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून काढल्या जातात. यंदा दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे प्रशासनाने कायदा व सुवेवस्था अबाधित ठेवणे साठी अथक परिश्रम घेत संपूर्ण पोलीस प्रशासनाने दोन्ही धर्मियांचे सण दोन्ही धर्मियांना निर्विघन पणे साजरे करता यावे म्हणून अचूक नियोजन करून, योग्य बंदोबस्त लावून, एक चांगले वातावरण तयार केल्यामुळे दोन्ही धर्मियांनी आपले सण अत्यंत उत्साहात, आनंदात साजरे केले.

म्हणून पोलीस प्रशासनाच्या या योगदानाबद्दल आज सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन तर्फे प्रशासनाचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्याकरिता जळगांव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व जळगांव उप विभागाचे पोलीस उप अधीक्षक नितीन गणापुरे यांना पुष्पगुछ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली नियाज अली, सय्यद उमर, शेख जमील, सय्यद जावेद, कामिल खान, इमाम भाया, शफी ठेकेदार, शेख शब्बीर, असलम खान, शाहिद शेख इ. उपस्थित होते






