जळगावातील तरुण बांधकाम व्यवसायिकाची ७० लाखात फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा
महा पोलीस न्यूज | १५ जून २०२४ | जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या तरुण बांधकाम व्यवसायिकाची ७० लाखात फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरसोली प्र.बो. येथे शेतजमीन विक्री असल्याचे सांगत टप्प्याटप्याने पैसे घेत फसवणूक करण्यात आली आहे. संशयीत आरोपी धीरज पाटील यास शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी पियुष कमलकिशोर मणियार, वय-२६ वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी वर नमुद ठिकाणी माझे परिवारासह राहण्यास असुन माझा मणियार मल्टीसर्व्हिसेस नावाने बांधकाम व्यवसाय असुन ऑफीस गोविंदा रिक्षा स्टापजवळ आहे. मी भविष्याचे दृष्टीने जमिनीत पैसे गुंतवणुक करित असतो. शेतीत पैसे गंतवित असल्यामुळे व माझा बांधकाम व्यवसाय असल्याने रिअल इस्टेट एजंट यांचेशी माझी ओळख आहे. तसेच ते देखील मला ओळखत असुन, त्यांचेकडे जमिनी संबंधाने काही व्यवहार असल्यास ते मला माझे ऑफीसला येवुन कळवित असतात.
माझे शेजारी राहत असलेला अमरनाथ मंगेश ठाकुर, रा. गणेशवाडी, जळगाव यास रियल इस्टेट एजेंट धिरज विजय पाटील, रा.प्लट नं.१३, जयविजय बिल्डींग, रिंगरोड, जळगाव याने माझे जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉपच्या ऑफीसला घेवुन आला. त्यावेळी धिरज पाटील याने त्याचेकडे शिरसोली प्र.बो., ता. जि. जळगाव येथे शेती असल्याचे सांगीतले. मी धिरज पाटील यास सर्व माहिती विचारून मला शेत जमिन दाखविणेबाबत सांगीतले. त्यानुसार दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी मला शिरसोली प्र.बो. येथील गट नं.२२३/३ येथे धिरज पाटील याचे मोटार सायकलवर घेवुन गेला. मी सदर क्षेत्रावर गेल्यानंतर मला सदरचे क्षेत्र आवडले, तसेच गट नं.२२३/३ चा ऑनलाईन ७/१२ पाहिला असता सदर शेतजमिन हि रविंद्र शांताराम पाटील व दत्तु शांताराम पाटील असे सामाईक क्षेत्र असल्याचे दिसुन आल्याने मी धिरज पाटील यास सदर शेतमालकासोबत माझी भेट करून देणेकरिता सांगीतले असता त्याने शेतकरी श्री रविंद्र शांताराम पाटील याचे सोबत त्याने सौदा पावती केलेली असुन तोच सदर शेतजमिनीचा मालक असुन फक्त खरेदीसाठी मालक रविंद्र शांताराम पाटील येईल असे सांगीतले.
दुसऱ्या दिवशी एजंट धिरज पाटील यास शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यास माझे ऑफीसला घेवुन आला. तेव्हा त्यांचे सोबत बैठक करून देवुन सदर शेतजमिनीचा भाव ठरवुन एकूण क्षेत्र १.२६ आर पैकी ०.६३ आर शेतजमिन हि ९० लाखात घेण्याचा व्यवहार ठरला. सदर व्यवहाराचे दिवशी आमचे सोबत अमरनाथ मंगेश ठाकुर, भाऊ आयुष कमलकिशोर मणियार, अमोल अशोक धांडे असे हजर होते. धिरज पाटील याने त्याचा व्यवहार हा शेतकरी रविंद्र पाटील याचे सोबत झाला असल्याचे सांगीतलेले असल्याने मी त्यांचा झालेला सौदा पावतीचा करारनामा व्यवहार रद्द करणेबाबत सांगीतले. त्यावेळी त्याने रविंद्र पाटील व धिरज पाटील यांच्यात झालेला दिनांक १५ मे २०२३ रोजीचा सौदापावती करारनामा रद्द झालेबाबतचा करारनामा दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी केलेला आहे. मी त्याच दिवशी शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यांचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या खात्यावर माझे एचडीएफसी बँकेच्या खात्यावरून चार लाख रूपये आरटीजीएसद्वारे दिलेले आहेत. तसेच सव्वीस लाख रूपये रोखीने असे एकूण तीस लाख रूपये शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यांना धिरज पाटील यांचे मध्यस्थीने तो समक्ष हजर असतांना दिलेले आहेत.
शेतकरी रविंद्र शांताराम पाटील व माझेत सदरचा व्यवहार नव्वद लाख रूपये असा ठरला असलेबाबत दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी सौदापावती करारनामा लिहून दिलेला आहे. तरी त्यांनतर धिरज पाटील व शेतकरी रविंद्र पाटील यांनी त्यांचा जयदिपसिंग रविंद्रसिंग पाटील, रा.एसएमआयटी कॉलेज जळगाव यांचेशी सदर शेतजमिनीचा व्यवहार झालेला असुन तो रद्द करावयाचा असल्याने अजुन पैसे दया असे धिरज पाटील याने सांगीतले. त्यावेळी त्यांना सदरचा व्यवहार हा पुर्ण करा व पैसे लगेच घ्या असे सांगीतले. परंतु ते ऐकत नसल्याने मी दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी रविंद्र शांताराम पाटील यांना दहा लाख पंधरा हजार रूपये व दोन लाख ५ हजार रूपये असे एकूण बारा लाख वीस हजार रूपये माझे एचडीएफसी बँकेच्या खात्यातुन आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले.
संपूर्ण रक्कम हि रविंद्र पाटील यास मिळाल्यानंतर जयदीपसिंग रविंद्र पाटील व रविंद्र शांताराम पाटील यांनी दि.६ जून २०२३ रोजी त्यांच्यात झालेला सौदा पावती करारनामा रद्द झालेबाबत रद्द करारनामा केलेला आहे. त्यानंतर मी दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकरी रविंद्र पाटील याचे बंक खात्यावर एकोणीस लाख रूपये व नऊ लाख अठ्ठावीस हजार रूपये असे एकूण अठ्ठावीस लाख अठ्ठावीस हजार रूपये माझे एचडीएफसी बँक खात्यावरून आरटीजीएस केलेले आहेत. तरी मी रिअल इस्टेट एजंट धिरज विजय पाटील यांचेवर विश्वास ठेवुन त्याचे मध्यस्थीने शेतकरी रविंद्र शांताराम पाटील यास एकुण रक्कम सत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार रूपये रोखीने व आरटीजीएसद्वारे देवुन देखील शेतकरी खरेदी खत करून देणेसाठी आलेला नाही.
मी खरेदी खत रजिस्ट्रेशन करणेसाठी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी एकूण चार लाख बत्तीस हजार रूपये शासकीय चलन भरलेले आहे. तसेच मी शेतकरी यास पैसे देणेसाठी पाच लाखाचे चार चेक असे चेकवर सहया करून शेतकरी रविंद्र पाटील यास देणेसाठी बनवुन ठेवले होते. तरी देखील शेतकरी रविंद्र पाटील यांचेशी झालेला सदरचा व्यवहार पुर्ण करण्याची जबाबदारी असतांना एजंट धिरज विजय पाटील हा रविंद्र पाटील यांना रजिस्टेशन करिता सोबत घेवुन आलेला नाही. त्यावेळी मी शेतकरी रविंद्र पाटील यास फोन केला असता त्यांने सांगीतले की, एजंट धिरज पाटील याने त्याचे पैसे दिलेले नसल्याने तो शिरसोली प्र.बो. ता. जि. जळगाव गट नं. २२३/३ क्षेत्र १.२६ आर पैकी ०.६३ आर शेत जमिनीचा व्यवहार पुर्ण करू शकत नाही म्हणुन खरेदी खत दस्ताएवज रजिस्टेशन करून देणेसाठी येत नसलेबाबत कळविले.
मी लगेच धिरज पाटील यास त्याबाबत विचारणा करणेसाठी फोन केला असता त्याने मला शेतकरीला घेवुन येतो ती माझे जबाबदारी आहे काळजी करू नको असे म्हणुन मनधरणी केली. परंतु सायंकाळपावेतो शेतकरी रविंद्र पाटील व एजंट धिरज पाटील असे आले नाहीत, त्यांनतर देखील धिरज विजय पाटील यास वारंवार फोन करून खरेदी खत रजिस्ट्रेशन करून देणेसाठी सांगीतले असता त्याने मी शेतकरीला घेवुन येतो असे सांगुन शेतकरी व एजंट दोघे खरेदी खत रजिस्ट्रेशनसाठी आलेले नाहीत.
एजंट धिरज विजय पाटील, रा.रिंगरोड जळगाव व शेतकरी रविंद्र शांताराम पाटील, रा.शिरसोली, ता.जि.जळगाव यांनी मी दिलेल्या ७० लाख ४८ हजार रुपये रकमेचा अपहार करून फसवणूक केलेली आहे म्हणुन माझी दोघांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी धीरज पाटील यास अटक केली आहे. संशयीत आरोपी धीरज पाटील यास शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दि.१७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.