पिळोदे येथे नव चेतना शिबिर उत्साहात

पिळोदे येथे नव चेतना शिबिर उत्साहात
अमळनेर प्रतिनिधी I द आर्ट ऑफ लिविंग बेंगलोर व व्यक्ति विकास केंद्र बेंगलोर अंतर्गत अंमळनेर तालुक्यातील पिळोदे गावात 23 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान नव चेतना शिबिर उत्साहात पार पडले.
त्यास आर्ट ऑफ लिव्हिग शिक्षक बी एन पाटील, पोपट भराटे ,डॉक्टर आदित्य माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली पवनकुमार वाघ युवाचार्य यांनी नव चेतना शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.
त्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण होऊन मानसिक स्वास्थ शारीरिक स्वास्थ कसे सांभाळावे प्रसन्न व आनंदी राहण्यासाठी काय करावे याबाबत ज्ञान मिळाले. आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पानुसार प्रत्येकाचे जीवन तणाव मुक्त व्हावे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, प्रसन्नता यावी व आपला परिसराचा विकास होण्यासाठी संकल्प घेण्यात आला.
नव चेतना शिबिरार्थींना पिळोदे ग्रामस्थ बंधु भगिनीकडून शालेय साहित्य स्पर्धा परीक्षा पुस्तक वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण युवक रोहित पाटील यांनी परिश्रम घेतले.






