OtherCrime

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणातील ३.२२ लाखांची रक्कम तक्रारदारास परत

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकरणातील ३.२२ लाखांची रक्कम तक्रारदारास परत

नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची  कामगिरी

नाशिक | प्रतिनिधी

‘FedEx पार्सलमध्ये ड्रग्स आणि पासपोर्ट सापडले’ या बनावट गोष्टीवर विश्वास ठेवून डिजिटल अरेस्टच्या नावाने झालेल्या सायबर फसवणूक प्रकरणात नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तक्रारदारास ₹३.२२ लाखांची रक्कम परत मिळवून दिली. ही कामगिरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

फसवणुकीची युक्ती – स्काईप कॉल व पोलीस गणवेश

तक्रारदार सुरज भाउसाहेब काळे (रा. टाकळी विंदुर, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक) यांना अज्ञात व्यक्तींनी “FedEx ब्रांच, अंधेरी” येथून फोन केला. त्यांनी सांगितले की, “तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये ४ ईराणी पासपोर्ट आणि ड्रग्स आढळले आहेत.” त्यानंतर स्काईप अ‍ॅपद्वारे पोलीस गणवेशातील व्हिडिओ कॉल करून ‘डिजिटल अरेस्ट’ची धमकी देण्यात आली.

या भीतीमुळे तक्रारदाराकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून, १० लाखांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून ते RTGS मार्गे आरोपींच्या खात्यात वळवले गेले.

पोलीसांची तत्काळ कारवाई आणि रक्कम परत

सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन, पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सायबर पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, निरीक्षक नागेश मोहिते आणि मपोहवा सुवर्णा आहिरे यांनी बँकेशी पत्रव्यवहार करून संबंधित खातं गोठवलं. त्यात शिल्लक असलेली ₹३,२२,०००/- रक्कम न्यायालयाच्या आदेशाने तक्रारदारास परत करण्यात आली.

नागरिकांना सायबर पोलिसांचा महत्त्वाचा इशारा

नाशिक ग्रामीण सायबर पोलीसांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे की:

अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवू नका.

आपली बँक माहिती, OTP, डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स कोणालाही देऊ नका.

कोणताही शासकीय किंवा पोलिस अधिकारी फोनवर ‘डिजिटल अरेस्ट’ किंवा ‘पार्सलमध्ये ड्रग्स’ सांगून धमकी देत नाही.

अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा.

अशा संशयास्पद कॉल्सप्रकरणी तात्काळ सायबर पोलीस स्टेशन किंवा 1930, 1945 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

अधिकृत तक्रारीसाठी cybercrime.gov.in या पोर्टलचा वापर करा.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button