Social

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सजग राहा

गणेश विसर्जन मिरवणुकीत वीजयंत्रणेपासून सजग राहा

झेंडे, पताकांना स्टील रॉड वापरणे टाळा – महावितरणचे आवाहन

जळगाव, दि. ०४ सप्टेंबर २०२५ : गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र विसर्जन मिरवणुकीचा उत्साह ओसंडून वाहत असताना, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महावितरणने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मिरवणुकीदरम्यान वीजवाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्सफॉर्मर आदी वीज यंत्रणेजवळून जाताना विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

मिरवणुकीदरम्यान उंचावलेले रथ, सजावट केलेले मंडप, झेंडे वा पताका यांचा संपर्क वीजवाहिन्यांशी आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंडळांनी मिरवणुकीच्या मार्गा दरम्यान वीजवाहिन्या आणि विद्युत उपकरणांपासून आवश्यक तेवढे अंतर ठेवणे गरजेचे आहे.

नागरिकांनी तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी खालील बाबींची विशेष काळजी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे:

  • मिरवणुकीत उंच फलक, झेंडे, रथ वा सजावट अशा उपकरणांचा वापर करताना विद्युत वाहिन्यांपासून अंतर ठेवावे.
  • झेंडे, पताका यांना शक्यतो स्टीलचे रॉड वापरले जातात, स्टील हे वीजवाहक असल्याने प्रसंगी प्राणांतिक अपघात होण्याची दाट शक्यता असते.त्यामुळे स्टील रॉडच्या ऐवजी लाकडी अथवा पीव्हीसी पाईप वापरावेत.
  • ट्रान्सफॉर्मरजवळ, ओपन वीज तारा वा विद्युत यंत्रणेवर फटाके फोडू नयेत.
  • कुठेही तारा तुटलेले किंवा पडलेले दिसल्यास लगेच महावितरणच्या आपत्कालीन २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा स्थानिक महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

आपली सजगता अनेकांचे प्राण वाचवू शकतो. विद्युत अपघात टाळून सुरक्षित व आनंदी वातावरणात उत्सव पार पाडणे हेच सर्वांचे ध्येय असावे. नागरिकांनी आनंदाच्या उत्सवाबरोबरच सुरक्षिततेचाही विचार करून विसर्जन मिरवणुक सुरक्षित पार पाडावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button