लकड्या हनुमान शिवारात ४८० किलोचा ३३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत

लकड्या हनुमान शिवारात ४८० किलोचा ३३ लाख रुपयांचा गांजा हस्तगत
शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई ; एकाला अटक
शिरपूर प्रतिनिधी एका घरामध्ये ३३ लाख रुपये किमतीचा सुमारे ४८० किलो वजनाचा गांजा लपविल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी लकड्या हनुमान शिवारातील एका घरातून हा गांजाचा साठा जप्त केला असून आरोपी मणिलाल इसमल पावरा (लकड्या हनुमान, ता.शिरपूर) याला अटक केली आहे.
सूत्रांची दिलेल्या महतीनुसार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना लकड्या हनुमान शिवारात संशयीत मणिलाल याने गांजा लपवल्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी धाड टाकून शेतात२४ गोण्यांमध्ये भरलेला ४८० किलो गांजा जप्त करण्यात आला. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात हवालदार सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 15 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकातं धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, मिलिंद पवार, चालक अलता मिर्झा, कॉन्स्टेबल प्रकाश भील, कॉन्स्टेबल मुकेश पावरा, कॉन्स्टेबल रोहिदास पवार, कॉन्स्टेबल ग्यानसिंग पावरा, कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, कॉन्स्टेबल जयेश मोरे, कॉन्स्टेबल सुनील पवार तसेच गुन्हे शाखेचे हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, कॉन्स्टेबल मयूर पाटील आदींच्या पथकाने केली.