Other
शेताजवळ रिकाम्या होताय नगरपरिषदेच्या कचरा गाड्या

महा पोलीस न्यूज । विजय माळी । भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा गाड्या यशवंतनगर, पाण्याच्या टाकीजवळील सब स्टेशनच्या मागे, पाचोरा रोड, भडगाव येथील शेतकऱ्यांच्या शेताजवळील मोकळ्या जागेत रिकाम्या केल्या जात आहेत. या परिसरात गाव जवळ असल्याने मोकाट जनावरे कचरा खाण्यासाठी जमा होतात आणि शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात.
याबाबत काही शेतकऱ्यांनी मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीचे पुरावे (फोटो) जोडून नगरपरिषदेकडे लेखी तक्रार दिली आहे. शेतकऱ्यांनी नगरपरिषदेला विनंती केली आहे की, त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून घनकचरा योग्य ठिकाणी टाकावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल.