जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग १८ ‘अ’मधून शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग १८ ‘अ’मधून शिवसेनेचे गौरव सोनवणे बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी): महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींचा सिलसिला सुरूच असून, प्रभाग क्रमांक १८ ‘अ’ मधून शिवसेनेचे उमेदवार गौरव चंद्रकांत सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच महानगरपालिका परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्या बिनविरोध निवडीनंतर आज शिवसेनेलाही बिनविरोध यश मिळाले आहे. अनुसूचित जमातीसाठी असलेल्या प्रभाग १८ ‘अ’ मधील निवडणूक प्रक्रियेत मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्यामुळे गौरव सोनवणे यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे हे चोपडा मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र असून, त्यांच्या सामाजिक कार्याची प्रभागात विशेष ओळख आहे. युवा नेतृत्वाला संधी देत शिवसेनेने या प्रभागात विश्वास टाकला






