घरफोडी प्रकरणात एकाला अटक ; ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई

घरफोडी प्रकरणात एकाला अटक ; ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई
पाचोरा (प्रतिनिधी) – घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावत पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी सुमारे ४ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत एकाला अटक केली आहे.राजेंद्र किसन पाटील (वय ४२, रा. पिंप्री सार्वे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिंप्री सार्वे (ता. पाचोरा) येथे ७ एप्रिल २०२५ रोजी आनंदराव विठ्ठल पाटील यांच्या बंद घराच्या पत्र्याच्या खोलीत घुसून अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ६ तोळे सोने चोरी केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२५, भादंवि कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पो.उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पो.हे.कॉ. नरेंद्र नरवाडे, पो.कॉ. अमोल पाटील, नामदेव इंगळे आणि ईमरान पठाण यांचा समावेश होता. तपासादरम्यान राजेंद्र किसन पाटील (वय ४२, रा. पिंप्री सार्वे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून खालील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:
५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे , १० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस , २ चांदीचे पैंजण असा एकूण ४ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ. नरेंद्र नरवाडे करत आहेत.