भडगाव नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेची निर्विवाद सत्ता

भडगाव नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेची निर्विवाद सत्ता
१९ जागांवर विजय; रेखा प्रदीप मालचे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान
भडगाव-प्रतिनिधी भडगाव येथील नगर परीषद निवडणुकीत शिंदे शिवसेना १९ नगरसेवक,भारतीय जनता पार्टी ४ नगरसेवक , अपक्ष १ नगरसेवक निवडुन आलेले आहेत. तर लोकनियुक्त नगराध्यक्षही शिंदे शिवसेनेचे रेखा प्रदीप मालचे विजयी झाले आहे. भडगाव नगर परीषदेवर शिंदे शिवसेनेची सत्ता बसली आहे.भडगाव येथील तालुका क्रिडा संकुलात ही मतमोजणीची प्रक्रीया सकाळी १० वाजेपासुन सुरु करण्यात आली. सकाळी ९ वाजेपासुन निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरीकांची मोठी गर्दी उसळली होती. उमेदवारांची विजयाची घोषणा होताच विजयी उमेदवारांसह कार्यकर्ते व नागरीकांनी डिजेच्या तालावर गुलाल उधळीत शहरातुन विजयी मिरवणुका काढल्याचे दिसुन आले. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी शितल सोलाट यांनी प्रभागवाईज नगर सेवक व नगराध्यक्ष पदासाठीच्या विजयी उमेदवारांची घोषणा केली. सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी स्वालीहा मालगावे, निवाशी नायब तहसिलदार अनिल भामरे यांचेसह सर्व कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.दुपार नंतर शहरात दिवसभर डीजेच्या तालावर विजयी मिरवणुका सुरु होत्या. कार्यकर्ते आनंद व्यक्त करीत होते.
निवडून आलेले लोकनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक __
लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या रेखा प्रदीप मालचे या निवडून आल्या असून नगरसेवक पदाच्या २४ जागांपैकी शिवसेना शिंदे गट १९जागा भाजपा ४ त अपक्ष १ असे एकूण २४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत यामध्ये
प्रभाग क्रमांक एक अ) अंजना हिम्मत भिल्ल भाजपा (८८६), ब)जितेंद्र विठ्ठल पाटील भाजपा(७४९),
प्रभाग क्र.दोन अ) विजय कुमार नानासाहेब देशमुख शिवसेना(१३१४), ब) रंजनाबाई अनिल वाघ शिवसेना(७४४),
प्रभाग क्र.तिन अ) मिर्झा अंजुमपरविन बेग शिवसेना (१७८५)ब) सय्यद इमरान अली शहादत अली शिवसेना(१६६८), प्रभाग क्र चार अ) देशमुख करुणाबाई सुनील शिवसेना(१०६१) ब) सचिन विनोद कुमार चोरडिया भाजपा(११४२) , प्रभाग क्र. पाच अ) पाटील किरण अतुल शिवसेना(१०७९) ब) परदेशी अतुल भिकणसिंह शिवसेना(११९६), प्रभाग क्र. सहा अ) येवले योगिता शशिकांत शिवसेना(१२५४) ब) लखीचंद प्रकाश पाटील शिवसेना(१३९१), प्रभाग क्र. सात अ) फकीर नगमाबी अलीम अपक्ष(१२४१) ब) शेख खलील शेख अजीज शिवसेना(१६०३), प्रभाग क्र. आठ अ) पाटील समीक्षा लखीचंद शिवसेना(१३०१) ब) ॲड.अमोल नाना पाटील भाजपा(१५२३), प्रभाग क्र. नऊ अ) भोसले विजयकुमार रायभान शिवसेना(१५०५), ब) पाटील वैशाली विशाल शिवसेना(११६३), प्रभाग क्र. दहा अ)राजेंद्र महादू पाटील शिवसेना(१०६५), ब) पाटील ज्योती जितेंद्र शिवसेना(९९१), प्रभाग क्र. अकरा अ) अहिरे देवाजी बापू शिवसेना(९३६), ब) भोई कल्पनाबाई जगन शिवसेना(१२०१), प्रभाग क्र. बारा अ) ठाकरे राहुल राजेंद्र शिवसेना(१०७०), ब) महाजन वैशाली संतोष शिवसेना(१०७०) आदींची नगरसेवक पदी निवड झाली आहे.






