गुंतवणूक, मुलीच्या लग्नासाठी सोने खरेदीची चिंता सोडा, स्वर्णकन्या योजनेचा लाभ घ्या
भारतात प्रथमच दर महिन्याच्या भावाने सोने जमा करणारे प्रतिष्ठान भंगाळे गोल्ड

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । लग्न सोहळा म्हटला की पहिला प्रश्न येतो सोने खरेदीचा. त्यातच मुलीचे लग्न म्हणजे सोने जास्त खरेदी करावे लागते. मुलाचे पालक असो की मुलीचे सोने खरेदीची चिंता दोघांनाच असते. ऐनवेळी भार नको म्हणून भारतात प्रथमच दर महिन्याच्या भावाने सोने जमा करणारी स्वर्ण कन्या योजना भंगाळे गोल्ड प्रतिष्ठानने सुरू केली आहे. चला तर जाणून घेऊया..!
जळगाव जिल्ह्यातील सोने-चांदीचे दागिने खरेदीचे विश्वसनीय दालन म्हणजे भंगाळे गोल्ड. आकर्षक ऑफर, कमीत कमी मजुरी, उत्कृष्ट डिझाईन आणि भंगाळे परिवाराचे जळगावकरांशी असलेले ऋणानुबंध यामुळे भंगाळे गोल्ड अल्पावधीतच जळगावकरांच्या पसंतीस उतरले. भंगाळे गोल्डकडून विविध आकर्षक आणि लाभदायक योजना सुरू करण्यात आल्या असून त्यातील एक योजना म्हणजे स्वर्णकन्या योजना.
थोडक्यात समजून घ्या योजना
भारतात प्रथमच सोने संचय करणारी परिपूर्ण योजना म्हणजे स्वर्णकन्या योजना. खास मुलामुलींच्या लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये ११ महिने ठरावीक रक्कम जमा केल्यास १२ व्या महिन्यात विनामजुरी दागिने खरेदी करता येतील. म्हणजेच १०० टक्के मजुरी फ्री. दरमहा सोन्याचे भाव कमी जास्त होत असल्याने गुंतवणुकीच्या दिवशी असणारा दर मिळतो त्यामुळे कमी भावाचा जास्त फायदा होतो.
११ महिन्याची योजना, कमीत कमी ३००० रुपये गुंतवणूक
भविष्यात भार नको म्हणून पालकांसाठी ही योजना अतिशय फायदेशीर ठरत आहे. गुंतवणूक म्हणून योजनेत दरमहा कमीत कमी ३ हजार रुपये गुंतवावे लागतात. ११ महिने गुंतवणूक केल्यावर १२ व्या महिन्यात योजनेचा लाभ घेता येतो. योजना सुरू झाल्यानंतर ३६० दिवसांच्या आत सोने खरेदी करणे बंधनकारक असून तसे न केल्यास योजेनचा फायदा मिळणार नाही आणि जमा केलेली रक्कम परत करण्यात येते.
इथे साधावा संपर्क
गुंतवणूक आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी भंगाळे गोल्ड, राजकमल टॉकीज समोर, जळगाव फोन ०२५७-२२२१९१९ किंवा भंगाळे गोल्ड, साईबाबा मंदिर समोर, रावेर रोड, सावदा फोन ०२५८४-२२२४४४ याठिकाणी संपर्क साधावा.






