Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने व चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. सोन्याचे दर दररोज वाढतच असून नवा उच्चांक गाठत आहेत. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊया. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्डच्या भव्य दालनात आकर्षक दागिने आणि शुद्ध सोन्याची हमी उपलब्ध आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹९८,९३०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०८,००० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२४,५०० इतकाच कायम आहे. एक आठवड्यात सलग ५ दिवस सोन्याचे भाव वाढत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ नोंदवली जात असली तरी आजचे दर तुलनेने स्थिर राहिले आहेत. चांदीच्या दरात बदल झालेला नाही.
दररोजच्या बदलत्या सोन्या-चांदीच्या भावामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता असून, आकर्षक डिझाईन्स, खास ऑफर्स आणि विश्वासार्ह व्यवहारामुळे नागरिक भंगाळे गोल्डला प्राधान्य देत आहेत.






