Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्यात तब्बल १,५५० रुपयांची उसळी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी | जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोने व चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड या नामांकित दालनातील सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊया. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्डच्या भव्य दालनात आकर्षक दागिने आणि शुद्ध सोन्याची हमी उपलब्ध आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,००,४८०, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०९,७०० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,२६,००० इतका झाला आहे.
गणेशोत्सवात सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसून येत असून, आज एका दिवसात सोन्याच्या दरात तब्बल ₹१,५५० ची वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही ₹१,५०० ची वाढ झाली असून, भाव उंचावलेले दिसत आहेत.
दररोजच्या बदलत्या सोन्या-चांदीच्या दरामुळे सुवर्णप्रेमी आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आकर्षक डिझाईन, खास ऑफर्स आणि विश्वासार्ह व्यवहारामुळे नागरिक भंगाळे गोल्डला प्राधान्य देत आहेत.



