Social

मांसाहारी प्रेमींसाठी खुशखबर : ‘तवा’ द फॅमिली रेस्टॉरंट आजपासून पुन्हा आपल्या सेवेत सुरू…

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरामध्ये अल्पावधीतच खवय्यांच्या पसंतीला उतरलेल्या तवा द फॅमिली रेस्टॉरंट पुन्हा आपल्या सेवेत सुरू होत असून मांसाहारी प्रेमींसाठी विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी सज्ज झाले आहे.

डिसेंबर महिना म्हटला की मांसाहारी प्रेमींसाठी खास पर्वणी समजला जातो. गुलाबी थंडीत मांसाहारी पदार्थांचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. त्यातच ३१ डिसेंबरची सर्वच जण मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी धमाल मस्तीसह मांसाहारी आस्वाद प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना अस्सल कोकणी-मालवणी पदार्थांची लज्जत चाखता येईल.

आपणास येथे पाककलेत कुशल असलेले शेफद्वारे तयार केलेले सी फूड, पापलेट, सुरमई, रावस, बांगडा, बोंबील, मांदेळी या माशांचा फ्राय डिशपासून ते अगदी चिकन लॉलीपॉप, चिकन तंदुरी, तंदुरी कबाब, मटन करी, दम बिर्याणी अशा खास डिशेसचा समावेश करण्यात आला आहे. सर्व पदार्थ अगदी माफक दरात खवय्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

तोंडाला पाणी सुटेल अशा रुचकर मेजवानीचे मेन्यूकार्ड
तव्यावर केलेली तवा स्पेशल धुमधडाम ग्रेव्ही तुमचा स्वाद नक्कीच द्विगुणित करणार. तर मग वाट कसली पाहता आजच आमच्या तवा द फॅमिली रेस्टॉरंट ला भेट देऊन घ्या या सर्व मांसाहारी पदार्थांचा आस्वाद. येथे मिळणाऱ्या पदार्थांचा दरवळणारा सुगंध खाणार्‍यांचा आत्मा तृप्त करून टाकतो. असंख्य पदार्थ हे आपणास एकाच ठिकाणी उपलब्ध. मग वेळ कशाला घालवता आजच भेट द्या.. आपल्या सेवेची एक संधी द्या.. एक बार आओगे, बार-बार खाओगे!

पार्सल सुविधा देखील उपलब्ध
‘तवा’ द फॅमिली रेस्टॉरंट प्रभात चौक ,परदेशी सोडा समोर जळगाव हा हॉटेलचा पत्ता असून त्याठिकाणी पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे. संपर्क : 9764 000907, 7470777075 तसेच लवकरत तवा रेस्टॉरेंट स्विगी आणि झोमॅटोवर देखील उपलब्ध होणार आहे. तवा पुन्हा सुरू होणार असल्याने जुने ग्राहक खुश झाले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button