मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवसेनेची मोठी जबाबदारी
परभणी आणि बुलढाण्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती

मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवसेनेची नवी जबाबदारी
परभणी आणि बुलढाण्याचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती
मुंबई/जळगाव प्रतिनिधी
शिवसेना पक्षाने संघटन बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत वरिष्ठ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्याअंतर्गत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची परभणी आणि बुलढाणा जिल्ह्यांचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गुलाबराव पाटील यांना यापूर्वीही या जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय तसेच संघटनात्मक कामाचा अनुभव आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवत शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे.
नव्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “शिवसेना पक्षाने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी पूर्णतः न्याय देईन आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.”