Sport

नेहरू चषक हॉकी स्पर्धेत ‘विद्या इंग्लिश’ चे वर्चस्व; तिहेरी विजेतेपद पटकावले

नेहरू चषक हॉकी स्पर्धेत ‘विद्या इंग्लिश’ चे वर्चस्व; तिहेरी विजेतेपद पटकावले

जळगाव: जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि हॉकी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नेहरू चषक आंतरशालेय हॉकी स्पर्धेत विद्या इंग्लिश मीडियम स्कूलने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी दोन सुवर्ण आणि एक रजत पदक पटकावत तिहेरी विजेतेपद मिळवले. स्पर्धा पोलीस कवायत मैदान येथे पार पडली.

विद्या इंग्लिश स्कूलच्या संघाने १५ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकले, तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटात त्यांना रजत पदक मिळाले.

स्पर्धेतील अंतिम निकाल

१५ वर्षांखालील मुले:

विजयी: विद्या इंग्लिश स्कूल

उपविजयी: गोदावरी इंग्लिश स्कूल

तृतीय: पोदार इंटरनॅशनल स्कूल

१७ वर्षांखालील मुले:

विजयी: अँग्लो उर्दू हायस्कूल

उपविजयी: विद्या इंग्लिश स्कूल

तृतीय: पोदार इंटरनॅशनल स्कूल

१७ वर्षांखालील मुली:

विजयी: विद्या इंग्लिश स्कूल

उपविजयी: गोदावरी इंग्लिश स्कूल

तृतीय: पोदार इंटरनॅशनल स्कूल

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलने दोन गटांत उपविजेतेपद पटकावले, तर पोदार इंग्लिश मीडियम स्कूलने तिन्ही गटांत तृतीय क्रमांक मिळवला.

मान्यवरांच्या हस्ते गौरव

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना हॉकी जळगाव आणि स्पोर्ट्स हाऊस यांच्या वतीने चषक आणि पदके देऊन गौरवण्यात आले. यावेळी हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, हॉकी जळगावचे सचिव फारुख शेख, क्रीडा अधिकारी कार्यालयाचे प्रशिक्षक मीनल थोरात, हॉकी जळगावचे उपाध्यक्ष अक्रम शेख, झुलेखा देशमुख, हिमाली बोरोले, मुजफ्फर शेख, ममता प्रजापत, फुटबॉल प्रशिक्षक वसीम रियाज, विद्या इंग्लिशचे क्रीडा शिक्षक इम्रान बिस्मिल्ला आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत पंच म्हणून मुजफ्फर शेख, हिमाली बोरोले, इमरान बिस्मिल्ला, शहबाज पिंजारी आणि ममता प्रजापत यांनी काम पाहिले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button