पळासखेडे येथील बियर शॉपीवर पोलिसांची धाड, २८ हजारांची अनधिकृत दारू जप्त

महा पोलीस न्यूज । दि.२९ जुलै २०२५ । भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा बियर शॉपीमध्ये अनाधिकृत देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री होत असल्याची गुप्त माहिती भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, २९ जुलै रोजी भडगाव पोलिसांनी या बियर शॉपीवर धाड टाकली.
या कारवाईत पोलिसांनी २८ हजार रुपये किमतीचा अनधिकृत देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. संदीप जगदीश पवार (वय २२, रा. रुपनगर, पो. पळासखेडा, ता. भडगाव) हा व्यक्ती विक्रीच्या उद्देशाने विनापरवाना दारू बाळगताना आढळून आला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कडू परदेशी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुरनं. २७८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो.हे.कॉ. निलेश ब्राम्हणकर, पो.ना. मनोज माळी, पो.कॉ. प्रविण परदेशी, पो.कॉ. सुनिल राजपुत, पो.कॉ. संदीप सोनवणे आणि ललीत पाटील यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी करत आहेत.