Crime

ब्रेकिंग : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कुंटनखाना उधळला

महा पोलीस न्यूज | ३ मार्च २०२४ | भुसावळ शहरातील महेश नगर भागात माईंड अँड बॉडी स्किन केअर स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटनखान्यावर रविवारी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी काही पीडित महिलांची सुटका केली असून दाम्पत्याला अटक केली आहे.

भुसावळ शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांना रविवारी दुपारच्या सुमारास महेश नगर भागात माइंड अँड बॉडी स्क्रीन केअर स्पा या नावाखाली एक दाम्पत्य कुंटणखाना चालवित असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी लागलीच पथक तयार करून रवाना केले होते.

पथकाने सायंकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी छापा टाकला असता देह व्यापार चालविणारे विशाल शांताराम बऱ्हाटे, वय-३८ व त्याची पत्नी पल्लवी विशाल बऱ्हाटे वय-३९, दोन्ही रा.महेश नगर, भुसावळ व देह व्यापार करणाऱ्या पिडीत पाच महिला रा.करमाळा, जि. सोलापुर, ह. मु. मगरपट्टा पुणे, जामखेड, जि. अहमदनगर, पहुर, ता. जामनेर, जि. जळगांव, पिंपरी चिंचवड, पुणे, कुलाबा, मुंबई व येथील राहणाऱ्या व दोन इसम मिळून आले. तसेच त्याठिकाणी देह व्यापारास लागणारे साहित्य मिळुन आले आहे.

मुख्य वस्तीत बऱ्हाटे पती-पत्नी हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी व महिलांना पैश्याचे अमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करुन त्यांचेकडून देह व्यापार करून घेत होते. अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी त्यांचे अधिनस्त असलेले सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, सुदर्शन वाघमारे, महिला सहाय्यक फौजदार शालीनी वलके, प्रदिप पाटील, अश्विनी जोगी, अनिल झुंझारराव यांचे सहाय्याने सदर ठिकाणी दोन पंच, पंटर व पंचनाम्याचे साहित्यासह केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button