ग्रामपंचायत वडती येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामपंचायतस्तरिय कार्यशाळा

चोपडा (मिलिंद वाणी) ;चोपडा तालुक्यातील वडती, बोरखेडा ग्रामपंचायत अंतर्गत सोमवार, दिनांक-१५ रोजी समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामपंचायतस्तरिय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली.
कार्यक्रमाचे स्थळ जि.प.प्राथमिक शाळा, येथे ग्रामसेवक प्रविण पाटील, यांनी कार्यशाळेची प्रस्तावना सादर केली. तसेच अभियान अंतर्गत घटक निहाय माहीती देण्यात आली. यात महाराष्ट्र शासन ग्रामविकास विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद, जळगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अभियानाचा कालावधी दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 कालावधी असणार आहे. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
गावाचा विकासासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणार:- ऑड. गणेश पाठक
गावाचा सर्वांगीण विकासासाठी सर्व वैचारिक मतभेद विसरून सर्व नागरिकांनी आपल्या गावासाठी विकास कामासाठी प्रयत्न करणार आणी तालुक्यातील प्रथम तिन बक्षीसा मधे आपल्या गावाचे नाव असणार असे मत समाजसेवक ऑड. गणेश पाठक यानी आपले मत व्यक्त केले.
यावेळी वडती ग्रामसेवक प्रविण पाटील, ग्रामपंचायत सरपंच देविदास धनगर, उपसरपंच, गजानन कोळी, व सदस्य तसेच वडती तलाठी मॅडम, महीलाबचतगट, अंगणवाडी सेविका, डाॅ. भरत धनगर, पोलीस पाटील, नवल धनगर, कोतवाल अमिन पिंजारी, शिक्षक वृद व ग्रामस्थरीय कर्मचारी, आशा वर्कर्स, CRP तसेच पत्रकार, व ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





