Social
इनरव्हील क्लब जळगाव ईस्टने गरजू रुग्णांसाठी सुरु केली आर्थोबँक

इनरव्हील क्लब जळगाव ईस्टने गरजू रुग्णांसाठी सुरु केली आर्थोबँक
जळगाव : इनरव्हील क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे अर्थोबँक उपक्रम राबविण्यात आला. गरजू रुग्णांना अत्यावश्यक वस्तू मोफत मिळाव्या याकरिता क्लबतर्फे डॉक्टर दिनाचे औचित्य साधून जळगाव शहरातील रजनीगंधा हॉस्पीटल येथे शस्त्रक्रिया झालेल्या ज्या रुग्णांना व्हीलचेअर, वॉकर तसेच वॉकिंग स्टिक यांची आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी रुग्णालयाला २ व्हीलचेअर, ३ वॉकर तसेच ३ वॉकिंग स्टिक भेट स्वरूपात देण्यात आल्या. रुग्णांचा वापर झाला की या वस्तू पुन्हा रुग्णालयाला परत देण्यात येणार आहे. यावेळी डॉ. अभिजित पाटील, प्रियांका पाटील, क्लबच्या डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट कमिटी चेअर पीडीसी संगीता घोडगावकर, अध्यक्षा सिमरन पाटील, सचिव रितू शर्मा, पाटील जैन, उज्जवला राणे यांची उपस्थिती होती. डॉक्टर डे निमित्त क्लबतर्फे डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. अभिजित पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमामुळे गरजूंना लाभ होणार असल्याचे सांगितले. पीडीसी संगीता घोडगावकर व सिमरन पाटील यांनी हा उपक्रम कायमस्वरूपी सुरु राहणार असून या वस्तूंमध्ये सातत्याने वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन व आभार रितू शर्मा यांनी मानले.