Other

जागतिक महिला दिनी एचपीव्ही लसीचा शुभारंभ

जागतिक महिला दिनी एचपीव्ही लसीचा शुभारंभ

भडगाव (प्रतिनिधी) सध्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ लक्षात घेता सर्वाइकल कॅन्सर ह्या आजारावर आळा बसावा म्हणून आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही ह्या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. ८मार्च रोजी जागतिक महिला दिनी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे प्रथम लाभार्थी दिक्षा तांबटकर हिला लस देऊन शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आमदार किशोरआप्पा पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे ह्या होत्या. कार्यक्रमास नगरसेवक सचिनकुमार चोरडिया, वैशालीताई विशाल पाटील, इमरान सय्यद, राहुल ठाकरे, अतुलसिंह परदेशी, सामाजिक कार्यकर्ते जहांगीर मालचे हे उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज जाधव, भडगाव तालुका

आरोग्य अधिकारी डॉ. समाधान वाघ, स्त्री रोगतज्ञ डॉ. अंजली भेंडारकर, गिरडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, गटप्रवर्तक आशास्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. समाधान वाघ यांनी केले. सर्व पात्र मुलींनी लस घेऊन आरोग्य विभागास सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. समाधान वाघ यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय भडगाव व भडगाव तालुका आरोग्य विभागातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी, गटप्रवर्तक, आशास्वयंसेविका यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन पिंपरखेडचे आरोग्य निरीक्षक संजय सोनार कळवाडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गिरडचे आरोग्य निरीक्षक भरत गोसावी यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button