Special

ब्रेकिंग : जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली होणार, वाचा कोणाची नावे चर्चेत..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचा जिल्ह्यातील २ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांची पदोन्नती देखील झाली आहे. डॉ.महेश्वर रेड्डी यांची लवकरच बदली होणार असून वरिष्ठ पातळीवर तशा हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात येण्यास काही नावे चर्चेत असून कोण येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी ४ फेब्रुवारी २०२४ रोजी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. डॉ.महेश्वर रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविले आहेत. पारदर्शक बदली प्रक्रिया, क्यू आर कोड तक्रार पद्धत, हेल्पलाइन क्रमांक यासह सुशोभीकरण, नवीन इमारत उभारणी असे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले. एकंदरीत सर्व कामे बघता मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमात डॉ.महेश्वर रेड्डी यांचा सन्मान करण्यात आला होता.

पदोन्नतीवर होणार बदली
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची काही महिन्यातच पदोन्नती झाली होती. जळगाव जिल्ह्यातील २ वर्षाचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांना पदोन्नती मिळाली आहे. पदोन्नतीवर त्यांची बदली होणार असून मुंबई किंवा नवी मुंबई परिसरात त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.

‘या’ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत 
जळगाव जिल्हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात ४ मंत्री असल्याने सर्वांचाच पोलीस अधीक्षक पदासाठी ग्रीन सिग्नल आवश्यक असतो. सध्या जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, चंद्रपूर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन, नागपूर वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्यासह मुंबईतील एक महिला पोलीस अधिकारी यांची नावे चर्चेत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button