राज्यस्तरीय शालेय सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत जळगांवातील खेळाडूंची चमकदार कामगिरी
आकांक्षा , महाविरसिंग यांनी मिळविले यश

राज्यस्तरीय शालेय सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत जळगांवातील खेळाडूंची चमकदार कामगिरी
आकांक्षा , महाविरसिंग यांनी मिळविले यश
जळगाव I प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय राज्य व्दारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत जळगांवातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय सायकलिंग ट्रॅक स्पर्धेत शहरातील आकांक्षा म्हेत्रे (बाहेती महाविद्यालय ) १९ वर्षे मुलींच्या वयोगटात प्रथम क्रमांक व महाविरसिंग पाटील (सेंट जोसेफ हायस्कूल) १४ वर्षे मुलांच्या वयोगटात व्दित्तीय क्रमांक मिळविला.
या दोन्ही खेळाडूंची रांची (झारखंड) येथे होणाऱ्या १७ ते २१ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय ट्रॅक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक सागर सोनवणे यांचे मार्गदर्शक लाभले.