ब्रेकिंग : जुन्या वादातून दोन कुटूंब भिडले, १ ठार, ११ जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील बिलवाडी गावात दोन कुटुंबांमधील दहा वर्षांपासूनचा जुना वाद पुन्हा भडकला, ज्यामुळे रविवारी दुपारी १ वाजता घडलेल्या हिंसक झटापटीत एकाचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. या घटनेत ५५ वर्षीय एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींमध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर सध्या जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून वैमनस्य आहे. शनिवारी रात्री पाटील कुटुंबातील काही तरुणांनी गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीची दुचाकी अडवल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी स्थानिकांनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता.
रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांचे कुटुंबीय ग्रामपंचायतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत असताना पाटील कुटुंबातील काही सदस्य तिथे आले. यानंतर दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हिंसक हाणामारीत झाले. या हाणामारीत बांधकामाचे साहित्य, लाकडी दांडे आणि पावडी यांचा वापर झाला. या हिंसेत एकनाथ गोपाळ यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही गटांतील ११ जण जखमी झाले.
जखमींमध्ये पाटील कुटुंबातील किरण पाटील (वय २८), मिराबाई पाटील (वय ४५), ज्ञानेश्वर पाटील (वय ४०), दीपक पाटील (वय २३), संगीता पाटील (वय ४०) आणि गोपाळ कुटुंबातील जनाबाई गोपाळ (वय ५५), एकनाथ बिलाल गोपाळ (वय ३५), गणेश गोपाळ (वय २३), भीमराव गोपाळ आणि कमलेश पाटील (वय २६) यांचा समावेश आहे.
या घटनेनंतर गोपाळ कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यांनी जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून पुढील कारवाई करत आहेत.
पहा संपूर्ण घटनाक्रम :






