
भाजपा जळगाव जिल्ह्याची संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक संपन्न
जळगाव प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा संघटनात्मक आढावा व नियोजन बैठकीचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले. या बैठकीस मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे आणि केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसे उपस्थित होते.
बैठकीत प्रमुख मान्यवरांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केंद्र आणि राज्य स्तरावरून पक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आगामी कार्यक्रमांविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्राथमिक व सक्रिय सदस्य नोंदणी, नवीन मंडल व बूथ रचना यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
यावेळी आमदार अमोल जावळे, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वला बेंडाळे, सचिन पानपाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, नंदू महाजन यांच्यासह भाजपा जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.