नंदुरबारच्या दरोड्यातील गुन्हेगाराला जळगाव एलसीबीने पकडले
महा पोलीस न्यूज | १५ जुलै २०२४ | नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पोलीस ठाण्यात गेल्यावर्षी दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीच्या जळगाव एलसीबी पथकाने मुसक्या आवळल्या आहे. आशिष विलास तायडे वय २५ वर्षे रा. निमगाव रा.यावल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना सध्या जळगाव जिल्हयातील व इतर जिल्हयातील गंभीर गुन्हयातील पाहीजे व फरार आरोपीतांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी हवालदार प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांना यावल भागातील पाहीजे व फरार आरोपीतांचा शोध घेण्यातबाबत आदेशीत केले होते.
हवालदार प्रमोद लाडवंजारी व किरण धनगर यांना निमगाव ता. यावल गावातुन गोपीनीय माहीती प्राप्त झाली की, तळोदा पोलीस स्टेशन जि.नंदुरबार गुरनं ३१/२०२३ भादवि कलम ३९५,३९४,३४२,५०६ प्रमाणे दाखल दरोडा या गुन्हयातील पाहीजे असणारा आरोपी आशिष तायडे याच्यावर गुन्हा दाखल असुन तो गुन्हा घडल्यापासुन फरार आहे व तो त्याचे अस्तित्व लपुन छुप्या पद्धतीने त्याच्या गावात राहत आहे.
गोपनीय माहीतीवरुन निमगाव ता.यावल या गावात सापळा रचुन अशिष तायडे हा त्याचे राहते घराच्या गल्लीमध्ये उभा असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव आशिष विलास तायडे वय २५ वर्षे रा.निमगाव ता.यावल असे सांगितले. गुन्हयाच्या पुढील तपासाकामी आशिष तायडे यास नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे हवालदार देविदास वळवीसोबत पोलीस पथक आल्याने त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्याची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपरपोलीस अधीक्षक, अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.