भर चौकातून गावठी कट्ट्यासह एकाला एमआयडीसी पोलिसांनी पकडले
महा पोलीस न्यूज | २९ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यात सध्या पोलिसांची दमदार कामगिरी सुरू असून गावठी कट्टे बाळगणारे आणि विक्री करणारे रडारवर आहेत. गुरुवारी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौकातून एकाला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूससह ताब्यात घेतले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अंजिठा चौफूली परिसरात भुसावळ रोडवरील बस स्टॅण्डजवळ अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय – २४ रा.गेंदालाल मिल जळगाव हा गावठी कटटा जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. निरीक्षक आव्हाड यांनी लागलीच त्याठिकाणी पथकाला रवाना केले. पथकाने अर्शद यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याचेकडून एक गावठी मुगीर बनावटीचा गावठी कटटा व दोन नग जिवंत काडतुस असे जप्त करण्यात आले.
अवैध गावठी कटटा बाळगतांना मिळुन आल्याने त्याच्याविरुद्ध पोना सुधीर साळवे यांनी दिलेल्या फिर्यादवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्या.व्ही.एम.देशमुख यांनी ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ॲड.स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. पोलीस तपासात संशयिताकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. अर्शद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापुर्वी चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हवालदार किरण पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, किशोर पाटील, ललीत नारखेडे, राहुल रगडे, नितीन ठाकूर अशांनी केली आहे.