Special

जळगावकरांना लुटतेय ‘ऑनलाईन लॉटरी’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यासह शहरात अनेक अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांचे नवनवीन प्रकार दिवसेंदिवस डिजीटल होत चालले असून त्यात आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. ‘दस का दम’ नावाने सुरू असलेली ही सट्टा कम लॉटरी पद्धत जळगावकरांचा खिसा रिकामा करीत आहे. विशेष म्हणजे ही लॉटरी लोकल पातळीवर उघडली जात असल्याची माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सट्टा, पत्ता हा नेहमीचा विषय असला तरी आता ऑनलाईन जुगाराचा नवीन अड्डा सुरू झाला आहे. नाशिकसह अनेक ठिकाणी मोठा वाद उभा राहिलेला रोलेट आणि फन गेम जळगावात सुरू झाला आहे. दोन्ही गेमचे व्यसन फार घातक तर आहेच परंतु सोबतच ‘दस का दम’ हा ऑनलाईन गेम देखील जळगावात सुरू झाला आहे. नाशिकमध्ये एक तरुण शेतकरी या गेममध्ये ४५ लाख रुपये हरला तर एकाने ३० लाख गमावल्याने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात नाशिक येथील कैलास शहा या मास्टर माईंडला देखील पोलिसांनी अटक केली होती.

असा असतो ‘दस का दम’
‘दस का दम’मध्ये एक २० रुपयांच्या डावला १०० रुपये मिळतात तर फन टार्गेटमध्ये एका गेमला ९ ते ३६ रुपये मिळतात. शहरात अनेक ठिकाणी हा गेम सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने खेळला जाणाऱ्या या गेमचा निकाल अवघ्या १ मिनिटात येत असतो आणि दिवसभर हा खेळ सुरू असतो. पोलिसांचे अद्याप या खेळाकडे लक्ष वेधले गेले की नाही हा प्रश्न आहे.

जळगाव जिल्ह्यातील म्होरक्या कोण?
‘दस का दम’ गेम मनोरंजनात्मक खेळाच्या नावाखाली दाखवण्यात येतो मात्र त्याचे सर्व काम केवळ १ ऑनलाईन आयडीवर सुरू असते. एक ऑनलाईन आयडी तयार केल्यानंतर त्याद्वारे सर्व खेळ खेळले जातात. जळगाव जिल्ह्यात लॉटरीसाठी आयडी देणारा मुख्य म्होरक्या कोण हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी म्होरक्याचा शोध घेणे गरजेचे असून त्याला पकडल्यास संपूर्ण साखळी समोर येऊ शकते.

बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर उघडतो सट्टा
सट्ट्याचे आकडे मुळात ऑल महाराष्ट्र एकच उघडण्यात येतात. ‘दस का दम’चे देखील तसेच आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या कोणताही आकडा स्थानिक पातळीवर तयार केलेल्या बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढण्यात येत आहे. लोकल सॉफ्टवेअर असल्याने कमी रक्कम लावलेल्या जुगाराचा आकडा लागतो तर मोठ्यांना चुना लागत असतो. पोलिसांनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button