जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी मोठी कारवाई; नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शेकडो गुन्हे उघड

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी मोठी कारवाई; नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये शेकडो गुन्हे उघड
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव जिल्ह्यात दि. २८ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी अचानक राबविण्यात आलेल्या नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये मोठी कारवाई झाली. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात ही धडक मोहीम सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ या वेळेत राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये दारुबंदी, सट्टा-जुगार, एनडीपीएससह विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आले.
पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बबन आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिमेचे तपशील असे:
कॉम्बिंग ऑपरेशनमधील कारवाई:
दारुबंदीचे ५६ गुन्हे उघड ,सट्टा-जुगारावर २९ कारवाया ,एनडीपीएस अंतर्गत १६ व्यक्ती गांजा सेवन करताना पकडले. NBW वॉरंटची ४१ बजावणी, बेलेबल वॉरंटची १९ बजावणी , म.पो.का.क. कलम १२२ अंतर्गत २ गुन्हे नोंद, रेकॉर्डवरील ९९ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यानची कारवाई:
१५१७ वाहनांची तपासणी मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत ३०५ प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या २० जणांवर कारवाई झाली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चाळीसगावच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
पोलीस विभागाने सांगितले की, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशा प्रकारच्या अचानक कारवाया केल्या जाणार आहेत.