धक्कादायक : जळगावच्या पोलिसाने घेतला टोकाचा निर्णय..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात डीबी रायटर म्हणून कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले निलेश पाटील शनिवारी गावी एक कार्यक्रमासाठी गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले.
सोमवारी सकाळी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमीत मनेल यांनी भेट दिली असून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून मयताचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहे.
निलेश पाटील यांनी आजवर उत्कृष्ट काम केले असून एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. घडलेल्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून अनेकांना धक्का बसला आहे.





