जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे महिला दिन सप्ताह जल्लोषात साजरा

महा पोलीस न्यूज | १२ मार्च २०२४ | जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे जागतीक महिला दिनानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिन सप्ताहाच्या समारोप प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात पोलीस अधिकारी अंमलदार परिवारातील ६० स्पर्धक महिलांनी नृत्य, गायन, फॅन्सी ड्रेस यांसारख्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन १००० पेक्षा अधिक उपस्थित प्रेक्षकांची मने मोहून घेतली.
पोलीस कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमास प्रमुख अतिथी भुसावळ रेल्वेच्या डीआरएम इति पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधिक्षक, अन्नपुर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावित, धनंजय येरुळे, राजकुमार शिंदे, प्रमोद पवार यांचे सह इतर वरिष्ठ अधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा सत्र न्यायालय सरकारी वकिल रंजना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अपूर्वा वाणी यांनी केले. यशस्वितेसाठी सहाय्यक निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब गायकवाड, पप्पु देसले, चंद्रकांत राजपुत, जितेंद्र पाटील, निलेश शिसोदे, अश्विनी निकम, जागृती काळे व सर्व वेलफेअर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पोलीस दलातर्फे आयोजित महिला दिन सप्ताहात चित्रकला स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, हेल्मेट रॅली अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.