जळगावातील दोन पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी पदोन्नती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विभागीय अर्हता परीक्षा-२०१३ मधील उत्तीर्ण उमेदवारांपैकी जळगाव जिल्ह्यासाठी निवड झालेल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश दिनांक पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी निर्गमित केले आहेत.
जिल्हा पोलीसदलातील दिनेश विश्वनाथ बडगुजर आणि दत्तात्रय भिभर बडगुजर या दोघांना उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली असून नाशिक परिक्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात ते सेवा बजावणार आहेत. या पदोन्नतीने जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाची मनुष्यबळ क्षमता वाढणार असून, कार्यक्षमतेतही सुधारणा अपेक्षित आहे. पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या आदेशात पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांना तातडीने कार्यवाही करून पोलीस उपनिरीक्षक पदाचा पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयांनी या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेची नोंद घेऊन आवश्यक अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे.