जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला मुहूर्त; २१ आरोग्य सेवकांची पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला मुहूर्त; २१ आरोग्य सेवकांची पदोन्नती
जळगाव प्रतिनिधी l महापोलीस न्यूज l 10 मे 2025
जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांच्या रखडलेल्या पदोन्नतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. शुक्रवारी (९ मे) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या समुपदेशन प्रक्रियेत २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यकपदी पदोन्नती देण्यात आली.
आरोग्य विभागातील पदोन्नती प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित होती. सीईओ मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रलंबित पदोन्नती प्रकरणांचा आढावा घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार यापूर्वी ग्रामपंचायत व शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया पूर्ण झाली होती.
शुक्रवारी छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडलेल्या समुपदेशन प्रक्रियेत रिक्त पदांवर २१ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यक म्हणून पदोन्नतीने नियुक्त करण्यात आले. या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी उपस्थित होते.