भडगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचें स्वागत

भडगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचें स्वागत
तहसिलदार शितल सोलाट यांनी शालेय पुस्तके,गणवेश, क्रीडा साहित्य वाटप करत मार्गदर्शन केले.
भडगाव-प्रतिनिधी
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई यांचे शासन निर्णयान्वये शैक्षणिक सत्र २०२५-२६ मध्ये जि.प.मराठी शाळा टोणगाव ता भडगाव शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मिराबाई साळुंखे यांच्या उपस्थितीत व भडगाव तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके,गणवेश,बूट क्रीडा साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांसोबत गमती जमती चा खेळ खेळून संवाद साधला विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला गेला पाहिजे असे आवाहन देखील करण्यात आले सदर कार्यक्रमाला भडगाव ग्राम महसूल अधिकारी,अविनाश जंजाळे,महसूल सेवक किरण मोरे,माजी नगरसेविका योजनाताई पाटील शाळेय शिक्षक कर्मचारी वृंद,पालक वर्ग उपस्थित होते