Social

ईश्वर महाजन यांची “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” साठी उत्तर महाराष्ट्रातून निवड

ईश्वर महाजन यांची “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” साठी उत्तर महाराष्ट्रातून निवड

जळगाव प्रतिनिधी पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते. समाजातील प्रश्नांवर निर्भीडपणे प्रकाश टाकत सकारात्मक दृष्टीकोनातून सत्य मांडण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे ही अभिमानाची बाब आहे. अमळनेर तालुक्यातील पत्रकार
ईश्वर रामदास महाजन (अमळनेर जि.जळगाव) यांची व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने उत्तर महाराष्ट्रातून प्रतिष्ठेच्या “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”साठी निवड करण्यात आली आहे.

सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे दरवर्षी “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड” दिला जातो.यावर्षीचा हा सन्मान या विशेष पुरस्काराच्या स्वरूपात प्रदान करण्यात येणार आहे.

ईश्वर  महाजन हे आपल्या परखड, अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लिखाणासाठी ओळखले जातात. सामाजिक प्रश्न, जनतेच्या अडचणी आणि विविध घडामोडींवर त्यांनी सातत्याने प्रभावी लेखन करत पत्रकारितेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक विषयांना वाचा फुटली असून समाजात जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत व्हॉईस ऑफ मीडियाने त्यांची “ पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025” साठी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांच्या या यशामुळे अमळनेर तालुका व जळगाव जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्राचा सन्मान उंचावला आहे.

त्यांच्या या यशाबद्दल सहकारी पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

 

विशेष मार्गदर्शन व्हॉईस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनाचे राज्य संयोजक गोरक्षनाथ मदने, राज्य सरचिटणीस डॉ डिगंबर महाले, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पेश महाले यांचे लाभले.
त्यांचे अभिनंदन साप्ताहिक विंगचे जिल्हा अध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हाईस आँफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष जयेश कुमार काटे, सल्लागार
उमेश धनराळे,धनंजय सोनार, मिलिंद पाटील,
राज्य प्रसिद्धीप्रमुख बापूराव ठाकरे,
व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष उमेश काटे, व सर्व पदाधिकारी यांनी केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button