बांबरुड बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंचपदी एस.डी. खेडकर बिनविरोध

महा पोलीस न्यूज । विजय माळी । भडगाव तालुक्यातील बांबरुड बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी एस.डी. खेडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच अनिता दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत, ठरलेल्या वेळेत एस.डी. खेडकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी रवींद्र रायसिंग भिल यांनी सूचक म्हणून भूमिका बजावली. या बिनविरोध निवडीप्रसंगी जेष्ठ सदस्य मच्छिंद्र पाटील, माजी सरपंच शिवाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्योती पाटील, माजी उपसरपंच दीपक कोळी, माजी सरपंच कल्पना पाटील, भरत भिल, रवींद्र रायसिंग भिल, सुभाष महाजन, बाळासाहेब पाटील, ग्रामसेवक आर.बी. पाटील, साहेबराव जाधव, शिपाई उमेश भिल हे उपस्थित होते.
तसेच, पोलीस हवालदार विजय जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पाटील यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली. एस.डी. खेडकर यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.