करण पाटील यांना कार्यकर्त्यांनी घेतले खांद्यावर
चाळीसगाव ग्रामीण भागात केला प्रचार, उन्मेष पाटलांनी सांभाळली धुरा
महा पोलीस न्यूज | ४ मे २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट, महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांनी शनिवारी चाळीसगाव तालुक्यात प्रचार केला. प्रचारात काही उत्साही कार्यकर्त्यांनी करण पाटील यांना खांद्यावर घेत प्रचारात आघाडी घेतली.
महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील पारोळा, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल तालुका पिंजून काढला असून जोमाने प्रचार सुरू केला आहे. ग्रामीण भागात त्यांच्या पत्नी अंजली पाटील या देखील ज्येष्ठ नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या साथीने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. चाळीसगाव तालुक्यात उन्मेष पाटील आणि संपदा पाटील यांनी प्रचार सुरू केला आहे.
शनिवारी करण पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण भागात प्रचार फेरी काढली होती. एका गावात गेल्यावर काही कार्यकर्त्यांनी करण पाटील यांना चक्क खांद्यावर घेऊन जोरदार स्वागत केले. इतकंच नव्हे तर गावात त्यांना खांद्यावर घेऊन प्रचार देखील केला.