Crime
तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवून मागितली दोन लाखांची खंडणी

जळगाव : मुलांना दुचाकीवरुन कॉलेजमध्ये घेवून जात
असलेल्या ३३ वर्षीय तरुणाला अडवून त्याच्याकडे दोन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना शुक्रवारी असता नगर येथे साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी एका जनाविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) हा तरुण शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास ते दुचाकीवरुन मुलांना घेवून इकरा कॉलेज येथे घेवून जात होते. यावेळी अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मील, याने शेख अकबर यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत दोन लाखाची खंडणी मागितली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक संजय पाटील गुन्ह्याचा तपास करीत आहेत.