Crime

अवैधरित्या बारा गुरांना निर्दयपणे कोंबून जाणाऱ्या ट्रक स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

साडेसहा लाख रू किमतीचे गुरे गोशाळेत 

भडगाव- प्रतिनिधी : तालुक्यातील कजगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना उत्रान येथून चाळीसगाव कडे मधल्या मार्गाने जाणारा ट्रक मध्ये बारा गुरांना अवैधरित्या निर्दयपणे कोंबून घेऊन जाणारा ट्रक दिसला. यावेळी पथकाने त्या ट्रक चालकाला विचारपूस केले असताना कुठलीही पावती व परवाना आढळून आला नाही. याबाबत ट्रक व ट्रक वरील दोन्ही आरोपींना भडगाव येथे पोलीस स्टेशन येथे आणत आणत थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक मधील बारा गुरे भडगाव येथील गो शाळेत रवानगी करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,पो.कॉ.भुषण जगदीश शेलार,(वय 35 धंदा- नोकरी नेम- स्थानिक गुन्हे शाखा)

यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे,पो.कॉ.भुषण शेलार, महेश पाटील,सागर पाटील, बाबासाहेब पाटील आदींचे पथक गस्तीवर असताना कजगाव येथे दि.१९/८२०२५ रोजी सायंकाळी ७.३० वा. सुमारास यातील आरोपी १) रविंद्र राजेंद्र पवार वय -२५ वर्षे, धंदा चालक रा. पिंपरखेड तांडा, ता.चाळीसगांव,जि.जळगांव २) अनिल नामदेव जाधव,वय ४० वर्षे धंदा मजुरी,रा.पिंपरखेड तांडा,ता.चाळीसगांव,जि. जळगांव यांनी संगणमताने त्यांचेकडेस कोणताही रितसर परवाना नसतांना एकुण १२ बैलांना ट्रक.क्रं.एम.एच.४१ जी.७२९६ मध्ये अवैधरित्या निरर्दयतेने कोंबून व दोरीने लटकते बांधुन त्यांच्या सुरक्षेची कोणतही काळजी न घेता त्यांना ईजा होईल अश्या प्रकारे वाहतुक करतांना मिळून आले म्हणून वरील दोन्ही आरोपींविरुद्ध भडगांव पोलीस स्टेशन ला गु.र.न ३०१/२०२५ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम,१९६० कलम ११(१)(d),११(१)(e), ११(१) (f) स भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३(५) प्रमाणे

गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्हीही आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास पो.कॉ.किशोर सोनवणे हे करीत आहे.सदर या घटनेची माहिती मिळताच भडगाव शहरातील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येत गुरेही तात्काळ भडगाव येथील समर्पण गो शाळेत जमा केले. यावेळी नाना हाडपे,साजन पाटील, मयूर मालपुरे,चेतन पाटील,

कल्पेश पाटील, आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. रात्री बेरात्री अश्याच प्रकारे गुरांची वाहतूक भडगाव तालुक्यातून होते त्यावर ही अशीच कारवाई करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button