लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड !; या दिवशी जमा होईल सातवा हफ्ता ?

मुंबई (वृत्तसंस्था ) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड पसंती मिळाली असून या योजनेच्या माध्यमातून गेल्या 2024 या वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रूपये जमा झाले होते. हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत. जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता मिळणार आहे.हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी सरकार संक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरूवात जुलै महिन्यापासून केली होती. त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा केले होते. अशाप्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रूपये जमा केले आहेत.
आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे. आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतिक्षा लागली आहे. पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाही.पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे.गोड यासाठी कारण सरकार सातव्या हप्त्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे. 14 जानेवारीला मकरसंक्रात आहे. याच मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहीणचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागली आहे.